By  
on  

दशावताराची कथा 'पिकासो'मधून प्रेक्षकांसमोर, लाडका प्रसाद ओक साकारतोय प्रमुख भूमिका

'कच्चा लिंबू'नंतर दिग्दर्शक म्हणून अभिनेता प्रसाद ओक 'हिरकणी' हा सिनेमा घेऊन येत आहे. पण त्याची प्रमुख भूमिका असलेल्या सिनेमाबद्दल बोलाल तर आता एकच चर्चा रंगलीय ती म्हणजे 'पिकासो'ची. ह्या सिनेमात प्रमुख भूमिका साकारणा-या प्रसाद ओकच्या लूकची बरीच चर्चा रंगलीय. पोस्टर पाहून सर्वांचीच सिनेमाबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. बुटीक फिल्म स्टुडिओ' आणि 'प्लॅटून वन फिल्म्स' यांच्या संयुक्त निर्मितीत बनत असलेल्या पिकासो या आगामी मराठी सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच समोर आला. या सिनेमाचं पोस्टर बॉलिवूडचे प्रसिद्ध फिल्ममेकर महेश भट्ट यांनी पण ट्विट केलं. 

तळ कोकणातील दशावतार ह्या संकल्पनेवर हा सिनेमा बेतला आहे. कोकणातील लक्ष्मी नारायण मंदिरात 'पिकासो' ह्या सिनेमाचं शूटींग पार पडलं असून दशावतार ही 800 वर्ष जुनी लोककला आहे. सिनेमाची कथा व दिग्दर्शन अभिजीत मोहन वारंग यांचं असून त्यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. हा सिनेमा जगभरातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या '१० व्या जागरण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' व '७व्या ब्रह्मपुत्र व्हॅली फिल्म फेस्टिव्हल' करिता निवडला गेला आहे. २८ सप्टेंबर रोजी मुंबईत 'जागरण फिल्म फेस्टिव्हल' तर २९ सप्टेंबर रोजी 'ब्रम्हपुत्र व्हॅली फिल्म फेस्टिव्हल', गुवाहाटी येथे या चित्रपटाचे विशेष शो पार पडणार आहेत. 

बाल कलाकार समय संजीव तांबे याची मुख्य भूमिका आहे, तसंच प्रसादने दशावतारी रंजल्यागांजलेल्या व्यसनाधीन पित्याची विलक्षण भूमिका साकारली आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या किल्ला सिनेमाचे लेखक तुषार परांजपे हे पिकासोसाठी क्रिएटिव्ह दिग्दर्शक असून त्यांचे पिकासोच्या निर्मितीत विशेष योगदान आहे. सध्या सिनेमाच्या फर्स्ट लूकची विशेष चर्चा रंगली आहे. त्यामुळे सिनेमाची उत्सुकता  नक्कीच वाढली आहे. पण सिनेमासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पहावी लागणार आहे. पिकासो या वर्ष अखेरीपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येईल 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive