By  
on  

मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकरने लतादीदींच्या वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज 90 वा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने खास हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने एका व्हिडीओ मेसेजेव्दाारे  त्यांना शुभेच्छा दिल्या. सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करत त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. तसंच लतादीदींसोबतच्या जुन्या आठवणी जागवल्या आहेत. 

सचिन तेंडुलकर व्हिडीओत म्हणतो, " मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगू तर तुमचं पहिलं गाणं कधी ऐकलं हे मला आठवत नाही. पण जेव्हापासून समजायला लागलं तेव्हापासून असा एकही दिवस गेला नाही, जेव्हा मी तुमचं गाणं ऐकलं नाही.  ‘तू.. जहां.. जहां… चलेगा, मेरा साया साथ होगा…’ हे गाण तुम्ही माझ्यासाठी गायलं होतं. ते माझ्यासाठी सर्वांत मोठं बक्षिस आहे."

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive