By  
on  

खूप वेळा या आवाजाची भेट झाली पण तरीही हा आवाज हवाहवासा वाटतो: सलील कुलकर्णी

आज गानकोकिळा लता मंगेशकर यांचा ९० वा वाढदिवस. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित असणाऱ्या या दिग्गज गायिकेचा वाढदिवसानिमित्त जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लता मंगेशकरांना गायक-संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर हृद्य शब्दांमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. 

'या ईश्वरी स्वराला त्रिवार वंदन... थेट आत्म्यापासून आत्म्या पर्यंत पोचणारा हा ईश्वरी ध्वनी... करोडो लोकांनी हा आवाज कानांत साठवला .. हजारो गाण्यांमधून हा वाहिला ...अनेक संगीतकारांच्या रचनांना ह्या आवाजाने सजवलं...अनेकांचं आयुष्य उजळून गेलं .. लाखो ..करोडो वेळा या आवाजाची भेट झाली पण ..
तरीही प्रत्येक वेळेला तितकाच हवाहवासा वाटत राहतो .. करोडो लोकांमध्ये वाटून सुद्धा कधीथोडा सुद्धा कमी न झालेला ..आजही प्रत्येक क्षणी आपली सोबत करणारा ... कधीही न संपणारा .. परमेश्वराचा आशीर्वाद ... लतादीदी .. साष्टांग नमस्कार...' अशा शब्दांमध्ये सलील कुलकर्णी यांनी लतादीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

सलील कुलकर्णी यांनी लतादीदींचा एक फोटो शेयर करून या शुभेच्छा दिल्या आहेत. लतादीदी आज ९० वर्षांच्या झाल्या आहेत. आजही लता मंगेशकर यांची गाणी आवडीने ऐकली जातात. आजही संगीतक्षेत्रात लता मंगेशकर हे नाव ध्रुव ताऱ्यासारखं अढळ आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive