अभिनेता सुमित राघवनने जागवल्या दिवंगत विनोदवीर सतीश तारेच्या आठवणी

By  
on  

आपल्या जबरदस्त कॉमिक टायमिंगने सर्वांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे कॉमेडीकिंग सतीश तारे यांचे जुलै, २०१३ रोजी निधन झाले. आजही सतीश तारेंचा कॉमेडीचा जबरदस्त सेन्स नावाजला जातो. कॉमेडीकिंग सतीश तारेची अशीच एक आठवण अभिनेता सुमित राघवनने सोशल मीडियावर शेयर केली. 

सतीश तारे यांच्या 'येड्यांची जत्रा' सिनेमातला एक प्रसंग सुमित राघवनने शेयर केला. यावर सुमितने लिहिलं आहे. सतीश तारे हा खरोखर एक महान नट होता. या एका प्रसंगात तो किती कहर अभिनेता होता याची झलक पाहायला मिळते. भरत जाधव मागे उभा होता म्हणून. पण संदीप पाठक तर स्वतःला आलेलं हसू उघडपणे दाखवत आहे. तर मोहन जोशी मात्र हसू दाबण्याचा वायफळ प्रयत्न करताना दिसत आहेत. अशा शब्दांमध्ये सुमित राघवनने दिवंगत अभिनेता सतीश तारेच्या कॉमेडी टायमिंगचं कौतुक केलं. 

सतीश तारे हे मराठी सिनेसृष्टी आणि रंगभूमीवरील एक मातब्बर नट. त्यांनी अनेक सिनेमांमध्ये विनोदी भूमिका करून अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले. वयाच्या ५३ व्या वर्षी यकृताचा विकार आणि गँगरीन झाल्याने त्यांचे निधन झाले. 

Recommended

Loading...
Share