By  
on  

नवरात्र स्पेशल: ‘कुंकू’ ते ‘पोश्टर गर्ल’ असा होता मराठीतील नायिकाप्रधान सिनेमांचा प्रवास

नवरात्रीमध्ये मुख्यत्वाने होतो तो स्त्रीशक्तीचा जागर. रिअल लाईफमधील असो वा रील लाईफमधील नायिका कायमच लक्षवेधी राहिल्या आहेत. मराठी सिनेमाने रसिकांना आजवर केवळ नायक केंद्रित सिनेमेच दिले नाहीत तर गहिरा अर्थ उलगडणारे स्त्री प्रधान सिनेमेही दिले आहेत. मराठी सिनेमेची आशयघनता कायमच चर्चेचा विषय आहे.पाहुयात मराठीतील असे सिनेमे......

कुंकू: ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट सिनेमाच्या जमान्यातही स्त्रियांचं सामाजिक स्थान दर्शवणारा हा सिनेमा आजही स्त्री प्रधान मराठी सिनेमांच्या यादीत पहिल्या स्थानी आहे.

शामची आई: स्त्रिच्या मातृरुपाची तुलना इतर कोणत्याही रुपाशी करणं केवळ अशक्य आहे. त्यामुळेच हा सिनेमा स्त्रीप्रधान सिनेमांच्या यादीत खास स्थानी आहे.

मोलकरीण: जयश्री गडकर यांच्या अदाकारीने सजलेला सिनेमा म्हणून कायमच याकडे पाहिलं जातं. 

उंबरठा: कर्तृत्वासाठी घराबाहेर पडणारी सक्षम स्त्री स्मिता सारख्या सर्वगुणसंपन्न अभिनेत्रीने साकारली होती. 

मोकळा श्वास: वंश उजळवण्याचं काम केवळ मुलगाच नाही तर मुलगीही घराचं नाव उज्ज्वल करु शकते हाच संदेश या सिनेमातून दिला गेला आहे.

बिनधास्त: नावाप्रमाणेच बिनधास्त आयुष्य जगणा-या दोन मैत्रिणींवर बेतलेला हा सिनेमा आजही मुलींनी धाडसी असायला हवं हा संदेश देताना दिसत आहे. 

मी सिंधूताई सपकाळ: एक अनाथ, गरीब स्त्री मनात आणलं तर काय करु शकते याचं उत्तम उदाहरण हा बायोपिक आहे.

पोष्टर गर्ल: स्त्री ही अबला नाही तर सबला आहे. तिच्याविषयी वाईट विचार करणा-यांना ती वेळीच शासन करू शकते हाच संदेश या सिनेमातून दिला आहे. 

सावट: सक्षम, धाडसी स्त्री अधिकारी या स्मिता तांबेने साकारली आहे. चांगल्या-वाईटाच्या सीमेवरील असताना उत्तम निर्णय क्षमता कशी असावी याचं उदाहरण या सिनेमाने दिलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive