By  
on  

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे वृद्धापकाळाने दक्षिण मुंबईतील गावदेवी येथील राहत्या घरी आजारपणामुळे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.  ‘कितने आदमी थे’ हा शोलेमधील दमदार डायलॉग आठवल्यानंतर आठवतो तो गब्बर आणि भितीने गर्भगळीत झालेला सांबा. शोलेला आज अनेक वर्ष होऊन गेली. पण विजू यांच्या अभिनयाला लोक अजूनही विसरले नाहीत.

याशिवाय अंदाज अपना अपनामधील रॉबर्ट या व्यक्तिरेखेनेही त्यांना ओळख दिली. आजघडीला गोलमाल या सिनेमातील शंभूकाका नावाची छोटी भूमिका साकारली होती. 
अशी ही बनवा बनवी सिनेमात व्हिलनची भूमिका साकारून विजू यांनी आपण प्रत्येक भूमिकेत फिट बसत असल्याचं सिद्ध केलं. विजू खोटे यांना ‘पीपिंगमून मराठी’कडून भावपुर्ण श्रद्धांजली....

Recommended

PeepingMoon Exclusive