ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांच्या निधनाने हळहळली सिनेसृष्टी

By  
on  

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं नुकतंच निधन झालं आहे. ते ७८ वर्षांचे होते. यावेळी विजू यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी पुढे आले आहेत. विजू यांनी 300 हून अधिक हिंदी आणि मराठी सिनेमात काम केलं आहे. त्यापैकी विशेष लक्षात राहतो तो सांबा.  ‘कितने आदमी थे’ हा शोलेमधील दमदार डायलॉग आठवल्यानंतर आठवतो तो गब्बर आणि भितीने अर्धमेला झालेला सांबा. शोलेला आज अनेक वर्ष होऊन गेली. पण विजूभाऊंची अदाकारी विसरणं केवळ अशक्य. याशिवाय अशी ही बनवा बनवी मधील बाळी किंवा बॉलिवूडमधील रोटी, यारान, शान, शराबी या सिनेमातील भूमिका देखील संस्मरणीय अशा आहेत. पाहू कोण कोणत्या सेलिब्रिटींनी विजू खोटेंविषयीची भावना व्यक्त केल्या आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share