By  
on  

Navaraatri Day 2: स्त्रीत्वाचं प्रतिक असलेल्या कामाख्या देवीच्या रुपातील या अभिनेत्रीला ओळखलं का?

देवीची अनेक नावं अनेक रुपं आहेत. प्रत्येक नावामागे, रुपामागे खास कारण आहे. स्त्रिच्या अस्तित्त्वाचं मुळ असणारी देवी म्हणून कामाख्या देवीकडे पाहिलं जातं. अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आज कामाख्या देवीच्या रुपातील फोटो फॅन्ससोबत शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने स्त्रियांवर होणा-या अन्यायाला वाचा फोडली आहे. काल म्हणजे घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी तेजस्विनीने अंबाबाईंरुपातील फोटो शेअर केला होता. यात कोल्हापुरला आलेल्या पुराबद्द्ल कॅप्शन दिलं होतं. तेजस्विनीच्या या दोन्ही लूकनंतर तिचा तिस-या दिवसाचा लूक कोणता असेल याची उत्सुकता तिच्या फॅन्सना आहे.

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

द्वितीय " कामाख्या " . . वेद , पुराण आणि संस्कृतीचा आपला देश... प्रत्येक नव्या जीवाची निर्मिती होते योनी मधून आणि म्हणूनच माझ्या या रूपात माझ्या योनीची पूजा होते. वेद सांगतात स्त्री प्रमाणे नदीही रजस्व संस्कारा नंतर जीवनाची (पाण्याची ) नवनिर्मिती करते तेंव्हा त्या काळात तिला स्पर्श करणं टाळावे. जिथे नदीला देखील अश्या प्रमाणे सन्मान देण्याची रीत आहे तिथेच प्रत्येक वर्षी ३०,००० हून अधिक शीलांचं हनन होतंय, ज्या योनीची पूजा व्हावी तिच्यावर निर्घृण वार केले जातात हे कसं सहन करू मी ? दुधाचे दात देखील न आलेल्या माझ्या लेकी वासनेला बळी पडतात तेंव्हा त्यासाठी कुणाला जवाबदार ठरवू मी ? . . Concept & Director : @dhairya_insta_ Photographer : @bharatpawarphotography Digital art by : @amol.hirawadekar @imvishalshinde @thenameisabhishekk Asst. Dir : @shraddha_kakade Jewellery by : @pngadgilandsons Makeup : @vinodsarode Hair : @sheetalpalsande Styled by : @stylistnakshu @saniyacool @pottering.vels Costumes By : @official_dadfashionstudio PR & Social Media By : @dreamers_pr Special thanks: @rjadhishh #navratri #tejaswinipandit

A post shared by Tejaswini Pandit (@tejaswini_pandit) on

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive