स्मिता तांबेने तिच्या ‘अमरिका’ सिनेमातील या व्यक्तिरेखेचे मानले आभार

By  
on  

कलाकाराला त्याची प्रत्येक भूमिका प्रिय असते. पण साकारलेल्या काही व्यक्तिरेखा कलाकाराच्या अगदी जवळ असतात. जोगवा, 72 मैल, देऊळ यांसारख्या सिनेमात उत्तम अभिनयाचं दर्शन घडवणारी अभिनेत्री स्मिता तांबेने मात्र एक खास आठवण शेअर केली आहे. स्मिताने मध्यंतरी ‘अमरिका’ नावाच्या सिनेमात काम केलं होतं. या सिनेमात तिने ‘अम्मा’ ही व्यक्तिरेखा साकारली होती.

या व्यक्तिरेखेचे स्मिताने आभार मानले आहे. यावेळी शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती म्हणते,’ अम्मा आपल्याला वाटतं ते, हवं ते व्यक्त करण्याची ताकद तू दिलीस. त्यातून मिळणारी मन:शांती मी अनुभवली. ही वाट दाखवल्याबद्दल मी तुझी ऋणी आहे.’ स्मिताने आजवर अनेक सिनेमांमधून उत्तम अभिनयाचं दर्शन रसिकांना घडवलं आहे. स्मिता एक उत्तम अभिनेत्री तर आहेच. पण संवेदनशील व्यक्तीही आहे. अलीकडेच ती ‘सावट’ नावाच्या सिनेमातून रसिकांच्या भेटीला आली होती.

Recommended

Loading...
Share