ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले

By  
on  

'शोले' सिनेमातल्या कालिया ह्या भूमिकेमुळे सिनेरसिकांच्या मनात अढळ स्थान पटकावणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे काळाच्या पडद्याआड गेले. ते ७८ वर्षांचे होते.  ‘कितने आदमी थे’ हा शोलेमधील दमदार डायलॉग आठवल्यानंतर आठवतो तो गब्बर आणि भितीने गर्भगळीत झालेला सांबा. शोलेला आज अनेक वर्ष होऊन गेली. पण विजू यांच्या अभिनयाला लोक अजूनही विसरले नाहीत.त्यांच्यावर 30 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार पार पडले. त्यांना निरोप देण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी साश्रूनयनांनी उपस्थिती लावली. 

याशिवाय अंदाज अपना अपनामधील रॉबर्ट या व्यक्तिरेखेनेही त्यांना ओळख दिली. आजघडीला गोलमाल या सिनेमातील शंभूकाका नावाची छोटी भूमिका साकारली होती. 
अशी ही बनवा बनवी सिनेमात खलनायक  साकारून विजू यांनी आपण प्रत्येक भूमिकेत फिट बसत असल्याचं सिद्ध केलं. विजू खोटे यांना ‘पीपिंगमून मराठी’कडून भावपुर्ण श्रद्धांजली....

 

 

 

विजू  खोटे यांची बहिण आणि अभिनेत्री शोभा खोटे त्यांना अखेरचा निरोप देताना. 

 

 

विजू खोटे यांचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेताना. ह्यावेळी प्रसिध्द निर्माता -दिग्दर्शक महेश टिळेकर उपस्थित होते. 

 

 

 

 

 

अभिनेते  जयवंत वाडकर आणि अॅडगुरु भरत दाभोळकरसुध्दा यावेळी उपस्थित होते. 

 

अभिनेता हर्षद वारसीसुध्दा विजू खोटे यांना शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित होता. 

 

Recommended

Loading...
Share