अभिनेत्री कतरिना कैफसोबत झळकली ही मराठमोळी ‘Fashion Diva’

By  
on  

अभिनेत्री पुजा सावंतचे सितारे सध्या चांगलेच फॉर्मात असल्याचं दिसत आहे. ‘जंगली’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या पुजाला आता एका जाहिरातीमध्ये चमकण्याची संधी मिळाली दिसत आहे. विशेष म्हणजे या जाहिरातीत पुजासोबत बॉलिवूड दिवा कतरिना कैफही दिसत आहे. एका दागिन्याच्या ब्रॅण्डसाठी पुजाने कतरिनासोबत हे शुट केलं आहे.

 

पुजा अलीकडेच ‘जंगली’ या सिनेमात दिसली होती. हा तिचा पहिलाच बॉलिवूड सिनेमा होता. या सिनेमात तिच्यासोबत विद्युत जामवालही झळकला होता. आता ती ‘दगडी चाळ 2’ च्या शुटिंगमध्येही व्यस्त आहे पुजाने आतापर्यंत नीळकंठ मास्तर, दगडी चाळ अशा सिनेमात अभिनयाची छाप सोडली आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Lights camera ....ohhh wait ..think

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on

Recommended

Loading...
Share