महागुरु सचिन पिळगांवकरांच्या घरी चोरी, विश्वासू नोकराने केला घात

By  
on  

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक, गायक म्हणजेच सचिन पिळगांवकर ज्यांना सर्वचजण महागुरु म्हणून संबोधतात त्यांच्याकडे चोरी झाल्याचे घ वृत्त आहे. त्यांच्या घरी काम करणा-या विश्वासू नोकरानेच घात केल्याचं निष्पन्न झालं आहे. नोकराने सचिनजींची आणि त्यांच्या वडीलांना प्राप्त झालेली सन्मानचिन्ह त्यांच्या कार्यालयातून चोरी केली व  भंगारात विकली. अमृत सोळंकी (३५) असे या नोकराचे नाव असून त्याला सांताक्रूझ पोलिसांनी अटक केली आहे.अमृतने ही सन्मानचिन्हे केवळ ४०० ते ५०० रुपयांना विकली असल्याची कबुली दिली. वडिलांनी इतके वर्षे मेहनत घेऊन कमावलेली सन्माचिन्ह कवडीमोल पैशासाठी विकी गेल्यामुळे सचिनजींना  मोठा धक्का बसला आहे.

Recommended

Loading...
Share