By  
on  

अभिनेता प्रसाद ओकचा 'सुवर्णरत्न' पुरस्काराने सन्मान

अभिनेता प्रसाद ओकच्या 'हिरकणी' सिनेमाची चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता आहे.'कच्चा लिंबू' नंतर दिग्दर्शक म्हणून प्रसाद ओकचा हा दुसरा सिनेमा. सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेला ह्या ऐतिहासिक सिनेमात बाळासाठी व्याकूळ झालेल्या  हिरकणीची शौर्यगाथा अनुभवता येणार आहे. या पार्श्वभूमीवर नुकताच अभिनेता प्रसाद ओकचा पुण्यात 'सुवर्णरत्न' पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी ह्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रसाद ओकला प्रदान करण्यात आला. 'हिरकणी'  सिनेमाच्या प्रोमोशनसाठी ह्या पुरस्कारामुळे आपल्याला आणखी ताकद मिळाल्याचा आनंद प्रसादने व्यक्त केला आहे. 

मराठी सिनेसृष्टीतील सर्वच मित्रांकडून ह्या पुरस्कारानंतर प्रसादवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

 

 

प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी' हा बहुचर्चित सिनेमा २४ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता या सिनेमात शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार याची सर्वांना उत्सुकता आहे. 
 

Recommended

PeepingMoon Exclusive