By  
on  

अभिजीत बिचुकलेंनी दिलं आदित्य ठाकरेंना आव्हान

बिग बॉस मराठी सीझन 2 चे स्पर्धक अभिजीत बिचुकले हे शिवसेनेचे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंविरोधात रणांगणात उतरले आहेत. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे महायुतीचे उमेदवार म्हणून उभे आहेत. तिथूनच  अभिजीत बिचुकले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्जसुध्दा भरला आहे.  

अभिजीत बिचुकले साताऱ्यातूनही विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. भाजपचे उमेदवार शिवेंद्रराजे यांच्याविरोधात बिचुकलेंनी अर्ज दाखल केला असून  त्यांची पत्नीसुध्दा अलंकृता बिचुकले भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेल्या उदयनराजेंविरोधात लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार आहे.तसंच आपणच छत्रपतींचे खरे वारसदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत विधानसभा निवडणुकीसाठी वरळी मतदारसंघातून आपाला उमेदवारी अर्ज भरला आणि  महाराष्ट्रासाठी काम करण्याचं शिवधनुष्य पेललं आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive