By  
on  

'आरे वृक्षतोडी'नंतर सेलिब्रिटींचा सोशल मिडीयावर संताप

आरे कॉलनीतील मेट्रोच्या कारशेडप्रकरणी न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर शुक्रवारी रात्री झाडे तोडण्यास सुरूवात झाली आहे. शुक्रवारी रात्रीत जवळपास चारशेहून अधिक झाडं कापल्याचे समजते. झाडे तोडण्याचं हे काम पोलीस सुरक्षेत रात्रभर सुरू होतं.  अनेक पर्यावरणप्रेमी वृक्षतोडीची माहिती समजताच विविध ठिकाणाहून कारशेडच्या बाहेर विरोध दर्शवण्यासाठी जमले. कारशेडच्या जागी कोणालाही प्रवेश नसल्यामुळे अनेकांनी बाहेर रस्त्यावरच ठिय्या दिला. सर्वांचाच पर्यावरणाच्या हानीला कडाडून विरोध आहे. 

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, प्रियदर्शन जाधव, सई ताम्हणकर, दिया मिर्झा, विशाल दादलानी, स्वरा भास्कर, अशोक पंडित अशा अनेक कलाकारांनी जबरदस्त संताप सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला

 

Recommended

PeepingMoon Exclusive