By  
on  

अभिनेत्री दिपाली सय्यदही निवडणुकीच्या रिंगणात

सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं वारं तापताना दिसत आहे. या निवडणुकीच्या रिंगणात कलाकारही नशीब आजमावताना दिसत आहेत. अभिनेत्री दीपाली सय्यद हिने देखील कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून अर्ज भरला आहे. दिपाली या शिवसेनेच्या तिकिटावर ही निवडणूक लढवणार आहेत. दिपाली यांच्या विरोधात जितेंद्र आव्हाड निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

दिपाली यांनी नुकतीच सोशल मिडियावर यासंदर्भात पोस्ट टाकली आहे. ‘कळवा , मुंबरा विधानसभा मतदारसंघातून भाजप - शिवसेना महायुतीतर्फे अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रसंगी उपस्थित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक व नागरिकांचे मनस्वी आभार ! पुन्हा एकदा जनतेची प्रामाणिकपणे सेवा करण्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद असुद्या’ असं या पोस्टचं कॅप्शन आहे.

 

 

यापुर्वी त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. दिपाली यांनी यापुर्वीही निवडणुकीत हात आजमावला आहे. २०१४च्या लोकसभेत अहमदनगरमधून आम आदमी पार्टीकडून निवडणूक लढवली होती. आता या निवडणुकीत त्यांचा करिष्मा चालतो का ते लवकरच कळेल.

Recommended

PeepingMoon Exclusive