By  
on  

पाहा Video : अभिनेता स्वप्निल जोशीच्या घरी रंगला खास भोंडला

सध्या सर्वत्र नवरात्रीचा उत्साह ओसंडून वाहतोय. सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. आपण गरब्याच्या गाण्यांवर जबरदस्त ताल धरतो पण नुकतंच अभिनेता स्वप्निल जोशीच्या घरी भोंडल्यावर ताल धरला जातो याचं सुरेख चित्र पाहायला मिळालं. . त्याची चिमुरडी लेक मायरा व पत्नी आणि आई यांच्यासह अनेक महिला वलहान मुलींनी भोंडल्यावर फेर धरला आहे. आपण आपली संस्कृती,सण जपायला हवेत असा सुरेख संदेश स्वप्निल जोशीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून व्हिडीओ शेअर करत दिला आहे. 

स्वप्निल म्हणतो," वर्षाभर आपण सगळे उत्सव थाटामाटात साजरे करत असतो. आणि करायलाच हवेत...आणि तेही आपल्या संपूर्ण कुटुंबा सहित. आणि हे सण काय आहेत, त्याचं महत्व काय आहे, हे आपल्या मुलांना सांगणं, समजावणं, हेही आपलं कर्तव्य ! नाहीतर कालांतराने आपले सण आणि उत्सव, ह्यातली गम्मत हरवेल !म्हणून या वर्षी आईने घरी मायरा आणि राघवसाठी या नवरात्रात भोंडला केला. मायरानेही आपल्या आजी आणि आई सोबत छान फेर धरले."

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

वर्षाभर आपण सगळे उत्सव थाटामाटात साजरे करत असतो. आणि करायलाच हवेत... आणि तेही आपल्या संपूर्ण कुटुंबा सहित. आणि हे सण काय आहेत, त्याचं महत्व काय आहे, हे आपल्या मुलांना सांगणं, समजावणं, हेही आपलं कर्तव्य ! नाहीतर कालांतराने आपले सण आणि उत्सव, ह्यातली गम्मत हरवेल ! म्हणून या वर्षी आईने घरी मायरा आणि राघव साठी या नवरात्रात भोंडला केला. मायरानेही आपल्या आजी आणि आई सोबत छान फेर धरले. #gratitude #festival #marathi #navratri2019 #devi #happy

A post shared by Swapnil Anuradha Joshi (@swwapnil_joshi) on

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive