By  
on  

५० व्या 'इफ्फी' आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवात इंडियन पॅनोरमा विभागात या पाच मराठी सिनेमांची निवड

भारतीय सिनेजगतात मानाचे स्थान असलेला ५० व्या 'इफ्फी' या आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवाची सुरुवात २० नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या सिनेमहोत्सवात ‘इंडियन पॅनोरमा फीचर फिल्म’ विभागात पाच मराठी सिनेमांनी स्थान पटकावले आहे. एकूण २६ हिंदी सिनेमांमधून अनेक प्रादेशिक सिनेमांमधून या सिनेमांची निवड करण्यात आहे. 

या पाच सिनेमांमध्ये समीर विद्वांस  दिग्दर्शित आनंदी गोपाळ, शिवाजी लोटन पाटील यांचा भोंगा, सुजय डहाके दिग्दर्शित तुझ्या आयला, अनंत महादेवन यांचा ‘माई घाट : क्राईम नंबर १०३|२००५', आदित्य राही आणि गायश्री पाटील दिग्दर्शित 'फोटो फ्रेम' या मराठी सिनेमांची निवड करण्यात आली आहे. 

 

 

तसेच पॅनोरमा विभागात अन्य भाषांमधले बंगाली आणि मल्याळम भाषेतील प्रत्येकी तीन सिनेमे आहेत. गोवा येथे २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत हा सिनेमहोत्सव पार पडणार आहे. या महोत्सवाच्या विविध विभागात ७६ देशातील वेगवेगळ्या भाषांमधील २०० चित्रपटांचा समावेश आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive