By  
on  

‘तुला पाहते रे’ दुसरा भाग येणार? जाणून घ्या रवी जाधव काय म्हणतात

झी मराठीवरील प्रेक्षकांची लाडकी मालिका ‘तुला पाहते रे’ मालिका संपुन काहीच दिवस लोटले आहेत तरी प्रेक्षकांचं या मालिकेवरचं प्रेम कमी झालेलं नाही. या मालिकेसंदर्भात एक पोस्ट रवी जाधव यांनी नुकतीच शेअर केली आहे. यावेळी त्यांनी ईशा म्हणजेच गायत्री दातारसोबत एक फोटो शेअर केला आहे.

 

या फोटोच्या कॅप्शनमध्ये ते म्हणतात, ‘तुला पाहते रे- पार्ट 2. Coming soon. हे कॅप्शन वाचून तुला फॅन्सच्या आनंदाला पारावार उरला नाही. पण खरा ट्वीस्ट तर पुढेच आहे. या पोस्टमध्ये रवी यांनी #justjoking हा हॅशटॅगही वापरला आहे. म्हणजेच ही जोडी एकत्र दिसण्याची संधी सध्यातरी नाहीये. रवी जाधव यांनी ‘कच्चा लिंबू’ या सिनेमातून अभिनयाचा श्रीगणेशा केला आहे. याशिवाय गायत्री दातारही तुला पाहते नंतर ‘कोल्हापुर डायरीज’ या सिनेमात झळकणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive