By  
on  

Birthday Special: निखळ हास्याने आणि सुंदर अभिनयाने रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या रेणुका शहाणे

हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत स्वतःच्या निखळ हास्याने आणि सुंदर अभिनयाने हजारो लोकांच्या मनात स्वतःचं अढळ स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री रेणुका शहाणे यांचा आज वाढदिवस. 

आजही १९९० साली प्रदर्शित झालेल्या 'हम आपके है कोन' सिनेमाचं नाव घेतलं तर रेणुका शहाणेंची आठवण हमखास काढली जाते. सर्वांवर प्रेम करणारी आणि घर सांभाळणारी वहिनीच्या भूमिकेत रेणुका शहाणे यांनी सर्वांचे प्रेम मिळवले. 

रेणुका शहाणे यांनी हिंदीसोबत मराठीमध्ये सुद्धा महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. 'रिटा', 'हायवे', 'दुसरी गोष्ट', 'गुलाबजाम' यांसारख्या सिनेमांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. 

२००२ मध्ये रेणुका शहाणे यांनी बॉलिवूड अभिनेते आशुतोष राणा यांच्यासोबत विवाह केला. 

दूरदर्शनच्या 'सुरभी' आणि 'सर्कस' या मालिकांमधील भूमिकांसाठी आजही रेणुका शहाणे यांचे नाव त्यांच्या चाहत्यांच्या स्मरणात आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

And with the epitome of gorgeousness and grace @madhuridixitnene #BucketListpromotion

A post shared by Renuka Shahane (@renukash710) on

अभिनेत्री आणि सूत्रसंचालिका अशा अनेक गोष्टींमध्ये लीलया वावरणाऱ्या अभिनेत्री रेणुका शहाणे यांना पिपिंगमुन मराठीतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 

Recommended

PeepingMoon Exclusive