By  
on  

अभिनेत्री स्मिता तांबे यांनी नवरात्रीनिमित्त सादर केलं ‘धुनुची नृत्य’

अत्यंत कमी वेळात उत्तम अभिनयाने रसिकांचं मन जिंकणारी अभिनेत्री स्मिता तांबे यांचा एक नवा पैलू रसिकांसमोर आला आहे. स्मिता या उत्तम नृत्य देखील करतात.

त्यांनी नुकतंच दुर्गा पुजेतील मांडवात बंगालमधील प्रसिद्ध धुनुची नृत्य सादर केलं. धुनुची हे शक्ती नृत्य म्हणून ओळखलं जातं. शक्ती आणि उर्जेची उपासना करण्यासाठी हे नृत्य केलं जातं.

सप्तमी, अष्टमी आणि नवमी या दिवशी हे नृत्य सादर करतात. धुनीमध्ये हवन सामग्री आणि नारळाची करवंटी ठेवून हे नृत्य केलं जातं. बंगालमधील हा अत्यंत प्रसिद्ध नृत्यप्रकार आहे.  या नृत्याला ‘ढाक’ या वाद्यामार्फत साथ केली जाते. यावेळी स्मिता यांनी देवीचा आशिर्वादही घेतला.

 

Recommended

PeepingMoon Exclusive