By  
on  

१२ वर्षांच्या प्रवासात नायिकाप्रधान सिनेमे करण्याची संधी मिळाली याचा आनंद: सोनाली कुलकर्णी

झगमगत्या दुनियेत आपली स्वप्न उराशी बाळगून असंख्य जण दररोज येत असतात. काहींना यशाची गोडी चाखायला मिळते. तर काहींना मात्र अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांचं ओझं घेऊन आयुष्यभर जगावं लागतं. अशीच एक मुलगी झगमगत्या दुनियेत दाखल झाली आणि बघता बघता १२ वर्षांमध्ये तिने मराठी सिनेसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं. ती अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.

सोनाली कुलकर्णीने नुकतीच स्वतःच्या कारकिर्दीची १२ वर्ष पूर्ण केली. यानिमित्ताने पिपिंगमुन मराठीने सोनालीशी बातचीत असता सोनालीने १२ वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला. सोनाली म्हणाली,''गाढवाचं लग्न हा माझा पहिला सिनेमा. त्या सिनेमात मी छोटीशी भूमिका साकारली होती. परंतु नायिका म्ह्णून बकुळा नामदेव घोटाळे हा माझा पहिला सिनेमा. यानंतर बारा वर्षांच्या कारकिर्दीत 'पोश्टर गर्ल', 'हंपी', 'मितवा', 'क्लासमेट', 'अजिंठा' आणि आता 'हिरकणी' यांसारखे नायिकाप्रधान सिनेमे करण्याची संधी मिळाली.'

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

१२ वर्षांचं १ तप असतं... या १२ ऑक्टोबर ला मला मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण करून १२ वर्ष पूर्ण होत आहेत. इथून पुढचा प्रवास हिरकणी या चित्रपटाच्या प्रदर्शनाने सुरू होणार आहे, त्या आधीच मला पुण्यात अभिनयासाठी ‘सुवर्णरत्न’ २०१९ हा पुरस्कार देण्यात आला. हा एक सुवर्ण योगच म्हणावा लागेल. पुरस्कार निवड समिती आणि आयोजकांचे मनापासून आभार तसेच या प्रवासात सातत्याने पाठिंबा आणि प्रेम देत राहणाऱ्या मायबाप- रसिक प्रेक्षकांची सुद्धा मी ऋणी आहे...असेच पाठीशी रहा @suvarnnarattnaaward @sameerpaulaste @sagarpaulaaste

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

सोनाली पुढे म्हणाली,''१२ वर्ष झाली तरी अजूनही शिकतेच आहे. योगायोग म्हणजे पहिल्या सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे आणि आता हिरकणी चा दिग्दर्शक प्रसाद ओक या दोघांनी पण मला सांगितलं. कि येताना कोरी पाटी घेऊन ये त्यात रंग मी भरेन. त्यामुळे अजूनही शिकणं चालू आहे.'' अशा भावना सोनालीने व्यक्त केल्या. 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive