अभिनेता अतुल परचुरेची प्रमुख भुमिका असलेलं 'कापूसकोंड्याची गोष्ट' बालनाट्य लवकरच रंगभुमीवर

By  
on  

सध्या मराठी रंगभुमीवर बालनाट्यांना प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. वैभव मांगलेची प्रमुख भुमिका असलेलं 'अलबत्या गलबत्या', गायत्री दातार, अंकुर वाढवे आणि मयुरेश पेमची प्रमुख भुमिका असलेलं 'निम्मा शिम्मा राक्षस' यांसारखी बालनाट्य रंगभुमीवर जोरात सुरु आहेत. 

याच नव्या प्रवाहात आणखी एक बालनाट्य प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ते म्हणजे 'कापूसकोंड्याची गोष्ट'.चिन्मय मांडलेकरने या आगामी नाटकाची लेखन-दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. अभिनेते अतुल परचुरे या नाटकात प्रमुख भुमिका साकारणार आहे.

'झी मराठी' आणि 'अष्टविनायक' प्रस्तुत या आगामी बालनाट्याची सर्व नाट्यरसिकांना उत्सुकता आहे. यात आणखी कोणते कलाकार असणार आणि अजुन कोणते सरप्राईज मिळणार याची नाट्यरसिकांना उत्सुकता आहे.

Recommended

Loading...
Share