पाहा 'सिनियर सिटीझन'चा फर्स्ट लूक

By  
on  

रात्र आरंभ’, ‘एनकाऊंटर’, यही है जिंदगी  "एक होती वादी', 'रामचंद्र पुरुषोत्तम जोशी', 'चीटर'असे उत्तमोत्तम चित्रपट दिग्दर्शित केलेल्या अजय फणसेकर यांनी "सिनियर सिटीझन" हा नवा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला असून, या फर्स्ट लूकमधूनच चित्रपटाची उत्कंठा वाढली आहे. 

ॐ क्रिएशन्सच्या माधुरी नागानंद, विजयकुमार नारंग यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. राजू सावला यांनी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर, प्रमोद मोहिते कार्यकारी निर्माते, , बी. लक्ष्मण यांनी छायांकन आणि  राकेश कुडाळकर यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. तर अभिजित नार्वेकर यांनी संगीत आणि  नृत्य दिग्दर्शक म्हणून अमित बाईंगने काम पाहिले आहे.

पाठमोरी उभी असलेली सिनियर सिटिझन व्यक्ती आणि समोर दिसणारे तरूण असा हा फर्स्ट लूक आहे. सिनियर सिटीझन आणि तरूण यांना एकत्र आणणारं काय रंजक कथानक या चित्रपटात असेल याचं कुतुहल निर्माण झालं आहे. अभिनेता सुयोग गोऱ्हे, अमृता पवार, स्नेहा चव्हाण, श्रुती बोराडीया,किरण तांबे, अमोल जाधव, गौरीश शिपूरकर, हर्षल पवार आदी कलाकारांच्या या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका असून इतर काही महत्वपूर्ण कलाकारांची नावे ही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

अजय फणसेकर यांची दिग्दर्शक म्हणून आजवरची कामगिरी प्रयोगशील आणि लक्षणीय राहिली आहे. त्यामुळे 'सिनियर सिटिझन'मधून ते काय नवं सादर करतात, हे पहाणं महत्त्वाचं ठरेल.आता लवकरच हा चित्रपट आपल्या भेटीस येणार आहे.

  

Recommended

Loading...
Share