ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचं निधन

By  
on  

रंगभूमीची सेवा करणारे ज्येष्ठ अभिनेते अरुण काकडे यांचं नुकतंच निधन झालं आहे. ते 79 वर्षांचे होते. त्यांना 94 व्या नाट्यसंमेलनाचं अध्यक्षपद भुषवण्याचाही मान मिळाला होता. फेब्रुवारी 2014मध्ये हे संमेलनपार पडलं होतं. अरुण काकडे यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारानेही सन्मानित केलं गेलं होतं. त्यांनी ‘रंगायन’ ते ‘आविष्कार’ या ५० वर्षांचा नाटय़प्रवास अखंडपणे केला. त्यांच्या जाण्याने रंगभूमीचा आधार हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Recommended

Loading...
Share