By  
on  

Exclusive: रंगकर्मी अरुण काकडेंच्या निधनामुळे अभिराम भडकमकर आणि जयवंत वाडकर यांनी व्यक्त केल्या भावना

रंगभूमीची जवळपास 50 वर्षं सेवा करणारे ज्येष्ठ अभिनेते अरुण काकडे यांचं नुकतंच निधन झालं आहे. ते 79 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने नाट्यसृष्टीतील आधारवड हरवल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली आहे. पटकथा लेखक अभिराम भडकमकर आणि अभिनेते जयवंत वाडकर यांनी काकडे यांच्याविषयी पीपिंगमून मराठीकडे भावना व्यक्त केल्या आहेत.

अभिराम भडकमकर म्हणतात, ‘काकडे काकांच्या जाण्यामुळे रंगभूमी पोरकी झाल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने  प्रायोगिक रंगभूमीचा आधारवड गेला असं म्हणल्यास हरकत नाही. मी त्यांच्यासोबत काम केलं नाही, पण मला कायमच त्यांचं मार्गदर्शन मिळत होतं.’

यासोबत अभिनेते जयवंत वाडकर यांनीही काकडे यांची आठवण शेअर केली आहे. ते म्हणतात, ‘रंगभूमी आज ख-या अर्थाने पोरकी झाली आहे. त्यांनी आविष्कार या संस्थेला रुजवणं, जगवणं आणि मोठं करणं यामध्ये काकडे काकांनी मोलाची भूमिका बजावली आहे. आविष्कारच्या नाटकांनी मराठी रंगभूमीला, सिनेमाला अनेक कलाकार दिले, उदाहरणच द्यायचं झालं तर नाना पाटेकरचं देता येईल. काकांच्या मनात रंगभूमीविषयी अत्यंत कळवळा होता. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमीच्यं ख-या अर्थाने नुकसान झालं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive