पर्ण पेठेने ‘मीडियम स्पाइसी’ च्या सेटवर भरला पुरेपूर मसाला

By  
on  

अभिनेत्री पर्ण पेठे ही सेटवरील प्रँक्स आणि खोडकर वृत्तीसाठी ओळखली जाते. पुण्यात, ‘मीडियम स्पाइसी’ या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान तिने आपल्या सह-कलाकरांना आणि टीमला चांगलेच भंडावून सोडले होते. बरेचदा तिच्या निशाण्यावर चित्रपटाचे क्रु मेंबर्स असायचे. शिवाय अभिनेता ललित प्रभाकरला सुद्धा पर्णच्या या प्रँन्क्सची चव चाखायला मिळाल्याचे कळते.

असाच एक गमतीदार किस्सा चित्रपटाच्या शुटींग दरम्यान घडला. एका दृश्यात ललितने पर्णला उचलून घ्यायचे होते, त्याने तिला खाली ठेवत असताना तिचा पाय जोरात मुरगळला. तरी सुद्धा असह्य वेदना सहन करत तिने चित्रीकरण सुरूच ठेवले. या प्रकाराने ललितला वाईट वाटले, त्याने पर्णला कुठलीही मदत लागल्यास देऊ केली. या वेळी पर्णने सहजच आपली मेकअप रूम बरीच दूर असून तिथे आता कस जायचं? अशी शंका उपस्थित केली. म्हणून ललितने पर्णला तिच्या मेकअप रूमपर्यंत उचलून नेले. पण, ज्या क्षणाला ललित तिथे पोहोचला आणि त्याने पर्णला खाली ठेवले, तसा संपूर्ण सेटवर हास्यकल्लोळ झाला. कारण, पर्ण पेठे आणि सागर देशमुख यांनी रचलेला हा एक प्रँन्क होता असे समोर आले. सागरने पर्ण बरोबर पैज लावली होती, की ललित तिला उचलून मेकअप रूमपर्यंत घेऊन जाणार नाही. 

याविषयी बोलताना ललित म्हणाला, “होय, त्या दिवशी पर्ण ने मला तसे करायला भाग पाडले. आता हा पूर्ण किस्सा जेव्हा मला आठवतो तेव्हा मला हसू येतं.”

“तुमच्या सेटवर आनंदी वातावरण असेल तर अनेक गोष्टी अगदी सहज होतात आणि ‘मीडियम स्पाइसी’ बद्दल बोलायचे झाल्यास, हे मित्राचं गेट टू गेदर म्हणता येईल.” ललित पुढे म्हणाला, “या चित्रपटाची कथा नाती आणि त्यांच्यातील संबंधांविषयी भाष्य करते. आणि मला खात्री आहे की सेट बाहेरही आम्हा मित्रांमध्ये असलेल्या मैत्रीपूर्ण संबधांचा गोडवा पडद्यावरील नात्यांना अधिक जिवंत करेल.”

मोहित टाकळकर दिग्दर्शित, लँडमार्क फिल्म्स प्रस्तुत ‘मीडियम स्पाइसी’ या चित्रपटाच्या निर्मात्या विधि कासलीवाल आहेत. अभिनेता ललित प्रभाकर, सई ताम्हणकर आणि पर्ण पेठे प्रमुख भूमिकेत असून सागर देशमुख, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, इप्शीता, जेष्ठ कलाकार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी यांची सहकलाकार म्हणून साथ लाभली आहे
 

Recommended

Loading...
Share