पाहा Photo : अभिनेत्री स्पृहा जोशीचा हा मनमोहक अंदाज

By  
on  

एक गुणी अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशी ओळखली जाते. मालिका असो नाटक किंवा सिनेमा सर्वत्र ती आपला बहारदार अभिनय सादर करते. पण नुकतंच  'सूर नवा ध्यास नवा'  या गाण्यांच्या रिअॅलिटी शोची  सूत्रसंचालक म्हणून ती खुमासदार सादरीकरण करतेय. स्पृहाच्या ह्या सूत्रसंचलनामुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. नुकताच स्पृहाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक मनमोहक फोटो शेअर केला आहे आणि तो पाहून तुम्ही नक्कीच घायाळ व्हाल यात शंका नाही. ह्या गडद गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये स्पृहाच्या सौंदर्याला चार चाॅंद लागले आहेत. 

 

 

स्पृहा सो कॉल्ड स्टायलिश नसली तरी तिचा ड्रेस सेन्स मात्र उत्तम आहे. याचीच प्रचिती तिच्या अलीकडच्या फोटोंमधून येत असते.

 

 

स्पृहा जोशी ही मराठी सिनेविश्वातील एक गुणी अभिनेत्री असली तरी ती अभिनेत्री म्हणून जितकी लोकप्रिय आहे तितकीच तीच्या कवितांमुळे तिची एक वेगळी ओळख आहे. 'लोपामुद्रा' हा तीचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

का अवेळी चांदवाही काजळाया लागतो काय की, हा श्वासदेखिल पोरकासा भासतो . तू मुक्याने राहणे इतके जिव्हारी लागते अन् अजूनी चाहुलीने जीव हा भांबावतो.. . काय झाले,कोण चुकले, काय हाती नेमके? का मनाचा डोह सारे सादळाया पाहतो.. . पोरकेसे भासते प्रतिबिंब हे माझे मला काय सांगू मी, किती अभिनय करावा लागतो.. - स्पृहा ️ . @lets_draw_light

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad) on

 

 

Recommended

Loading...
Share