हिरकणीच्या शुटिंगवेळेस माझे केस आणि साडी जळाली होती: सोनाली कुलकर्णी

By  
on  

सध्या सगळीकडे 'हिरकणी' सिनेमाची जोरदार चर्चा आहे. या सिनेमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी 'हिरकणी'ची प्रमुख भूमिका आहे. हिरकणीची सोनालीने अनेक प्रकारे तयारी केली. यासंबंधी पिपिंगमुन मराठीशी बोलताना सोनालीने शूटिंगदरम्यान घडलेला एक थरारक किस्सा सांगितला. 

सोनाली म्हणाली,''रायगडावर हिरकणीचं शूटिंग करणं अत्यंत अवघड होतं. जिमी म्हणजे जी शूटिंगसाठी मोठी क्रेन असते ती रायगडाच्या पायथ्यावरुन वर नेणं तसेच संपूर्ण कलाकार आणि युनिट यांची ये-जा करणं आत्याचे आवाहनात्मक काम होतं. तसेच शूटिंग करताना माझी साडी आणि केस जळाले. परंतु जे हिरकणीने भोगलंय त्याच्या पुढे आमची संकटं काहीच नव्हती.''

 

 

प्रसाद ओक दिग्दर्शित हिरकणी' हा सिनेमा २४ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात शिवाजी महाराजांची भूमिका कोण करणार याची सर्वांना उत्सुकता आहे. 

Recommended

Loading...
Share