Birthday Special: कविता ते अभिनय असा होता अभिनेत्री स्पृहा जोशीचा प्रवास

By  
on  

कवयित्री, अभिनेत्री, सुत्रसंचालक अशा अनेक वेगवेगळ्या रुपात समोर येणारी अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी. स्पृहाने करीअरची सुरुवात नाटकांमधून केली. ‘अग्निहोत्र’ मालिकेमधून ती प्रेक्षकांच्या समोर आली. या मालिकेतील उमा या व्यक्तिरेखेने तिला ओळख दिली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

लोकांना परके करणारी अशी हुशारी नकोच मित्रा, खोट्याला मोठे करणारी अशी हुशारी नकोच मित्रा. . पांघरण्या पुरताच राहु दे हिशेबातला विवेक सारा, साध्यांना वेडे करणारी अशी हुशारी नकोच मित्रा. . निकोप खेळू आपल्यातला भातुकलीचा खेळ सौंगड्या, छाप्याचे काटे करणारी अशी हुशारी नकोच मित्रा. . खुशाल जा तू, शोध हवे ते.. मला फुलू दे माझी माझी !! बाईला दुबळे करणारी अशी हुशारी नकोच मित्रा. . नको लालसा नकोच स्पर्धा, अल्लद साधे सहज जगूया, होत्याचे नव्हते करणारी अशी हुशारी नकोच मित्रा. लोकांना परके करणारी अशी हुशारी नकोच मित्रा..!! - स्पृहा ️

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad) on

 

त्यानंतर ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेतील तिने साकारलेली कुहु रसिकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर स्पृहाने साकरलेली ‘रमाबाई रानडें’ची व्यक्तिरेखा तिच्या अभिनयाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेली.

 

 

रमाबाई साकारल्यानंतर स्पृहा ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या सिनेमातून रसिकांच्या भेटीला आली. यातील तिच्या समजुतदार व्यक्तिरेखेने रसिकांचं मन जिंकलं.

 

स्पृहा सध्या आपल्यासमोर ‘सुर नवा ध्यास नवा’ या रिअ‍ॅलिटी शो ची अ‍ॅंकर म्हणून समोर येत आहे. स्पृहाच्या सुत्रसंचालनाचा एक नवा पैलू यानिमित्ताने समोर येत आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

तू नदी आहेस.. वहात जा.. . दगड धोंडे काटे कुटे मधे येतील; खुपतील.. काचतील.. दऱ्या खोऱ्यात कट शिजतील, नको नको म्हणत म्हणत तुझी मुळं खोदून शोधतील.. वाकू नकोस, थकू नकोस कोणासाठी थांबू नकोस आतून हस, हिरवळ आण चिडशील तेव्हा प्रलय आण सारं काही पोटात घे परत तितकीच माया दे.. झाडांचं, लेकरांचं एवढं गाणं गात जा.. तू नदी आहेस.. वहात जा.. - स्पृहा️ . #wednesdaywisdom #wednesdayvibes #marathi #poem

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad) on

 

स्पृहा उत्तम अभिनेत्री आहेच. पण एक उत्तम कवयित्रीदेखील आहे. स्पृहाचा ‘लोपामुद्रा’ आणि ‘चांदणचुरा’ हा काव्यसंग्रह देखील प्रसिद्ध झाला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

माझ्या समोरची वेल पान एकही हलेना दूर एकटाच राघू सूर त्याचाही साधेना. . दाटे अवकाळी भीती गंध कसा फणा काढे सारे चुकती हिशेब सारे उलटे आकडे! . एका एका सरीसाठी जीव किती झुरवावा कुण्या एका हाकेसाठी किती टांगून ठेवावा? . आला श्रावण तरीही अशी वेडी पानगळ कसे जीवघेणे मौन अघोरीशी वावटळ. फक्त तुझ्यामाझ्यासाठी आता सारे हे थांबव, माझी तापलेली माती तुझ्या सरींनी भिजव..!! - स्पृहा @lets_draw_light

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad) on

 

ती आगामी ‘विकी वेलिंगकर’ या सिनेमातून रसिकांच्या समोर येत आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

माझ्या मित्रा, माझ्या सख्या एक दिवस इतका अचानक आलास की 'काळ' हैराणच झाला. माझ्या खोलीत येऊन उभा राहिला. संध्याकाळचा सूर्य मावळायला आला होता. पण थबकला. किंवा आपल्या नशिबात 'बुडणं' आहे, हेच विसरून गेला. . मग आदि नियमांनी आपल्याला पिळवटून शपथ घातली, काळाने त्या तशा उभ्या क्षणांना पाहिलं, आणि एकदम खिडकीतून बाहेर पळूनच गेला.. . घडून गेलेल्या आणि थांबून राहिलेल्या क्षणांची ती गोष्ट, आता तुलाही खूप आश्चर्य वाटतंय आणि मलाही. आणि कदाचित काळालाही पुन्हा ती चूक होणं मान्य नाही. . आता सूर्य रोज वेळेवर मावळतो आणि अंधार रोज माझ्या उरात भरून येतो! पण घडून गेलेल्या आणि थांबून राहिलेल्या क्षणांमागे एक सत्य आहे - तुला किंवा मला ते मान्य आहे की नाही, ही वेगळीच गोष्ट आहे! . पण त्या दिवशी 'काळ' जेव्हा खिडकीतून बाहेर पळून गेला, आणि त्या दिवशी जे रक्त त्याचे गुडघे खरचटून सांडलं, ते रक्त माझ्या खिडकीखाली अजूनही साकळलंय..!! -स्पृहा @the_humorous_anry

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad) on

 

स्पृहाला ‘पीपिंगमून मराठी’कडून वाढदिवसाच्या शुभेच्छा....

Recommended

Loading...
Share