By  
on  

‘कवी जातो तेव्हा’ संगीतमय नाट्य अभिवाचन

आपल्या तरल संवेदनांनी मराठी कवितेचे भावविश्व समृद्ध करणारे कवी म्हणजे ‘ग्रेस’. अनेक अर्थ निघणारी अशी त्यांची कविता. वेदनेचा शोध घेताना जाणिवांचे विविध स्तर त्यांची कविता उलगडते. सर्जनाचा शोध घेणाऱ्या ग्रेस यांच्या कविता पिढय़ान् पिढय़ांना खुणावत आल्या आहेत. अशा महान कवीच्या कवितांचा ‘कवी जातो तेंव्हा’ हा संगीतमय नाट्य अभिवाचनाचा कार्यक्रम जागर आणि गंगोत्री ग्रीनबिल्ड यांच्या सौजन्याने  मुंबईत रंगणार आहे.

‘अनुभव’ मासिकाच्या दिवाळीअंकात डॉ. समीर वसंत कुलकर्णी  यांनी कवी ग्रेस यांच्या  निधनानंतर एक लेख लिहिला होता ‘कवी जातो तेंव्हा ’ हे नाट्य अभिवाचन याच ललित बंधावर आधारलेलं आहे. या  कार्यक्रमामध्ये कवी ग्रेस यांच्या  कवितांचे सादरीकरण होईल. सोबत कविता समजून घ्यायची प्रक्रिया कवितेतील सुबोधता-दुर्बोधता या आणि इतर अनेक विषयांवर नाट्यपूर्ण रीतीने बोललं जातं.

‘कवी जातो तेंव्हा’ असा हा आगळा-वेगळा नाट्यानुभव अनुभवण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. या कार्यक्रमाचे लेखन व रंगावृत्ती डॉ. समीर वसंत कुलकर्णी यांची असून दिग्दर्शन अमित वझे यांचे आहे. जयदीप वैद्य, अपर्णा केळकर यांचे संगीत कार्यक्रमाला लाभले आहे. गजानन परांजपे, अमित वझे जयदीप वैद्य, अपर्णा केळकर, अंजली मराठे, निनाद सोलापूरकर, कौस्तुभ देशपांडे हे कलाकार हा कार्यक्रम सादर करतील. सर्व प्रयोगांचे मूल्य ऐच्छिक आहे. या कार्यक्रमाचे प्रयोग पुढीलप्रमाणे रंगणार आहेत.

 

कार्यक्रमाचे ठिकाण व वेळ

शुक्रवार १८ ऑक्टोबर रात्रैो ८.३० वा.  रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी

शनिवार १९ ऑक्टोबर सायंकाळी ५.०० वा. प्रबोधनकार  ठाकरे सभागृह बोरिवली

रविवार २० ऑक्टोबर सायंकाळी ५.०० वा. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive