By  
on  

सलमान खानचा बॉडीगार्ड शेराने केला शिवसेनेत प्रवेश

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं आहे. आता बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा विश्वासू बॉडीगार्ड शेरा म्हणजेच  गुरमीत सिंग याने नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री येथे शेराला शिवबंधन बांधण्यात आले. 

शेराने शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती शिवसनेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना शेराने शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेनेत आनंदाचं वातावरण आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive