By  
on  

नाना पाटेकरांच्या 'नटसम्राट'चा अधिकृत तेलगू रिमेक लवकरच रसिकांच्या भेटीला

मराठी रंगभूमीवर गाजलेलं नाटक म्हणजे वि.वा.शिरवाडकर लिखित 'नटसम्राट'. या नाटकाचं पुढे अनेक भाषांमध्ये रूपांतर झालं. आणि विविध भाषिक रंगभूमीवर या नाटकाचे प्रयोग करण्यात आले. २०१६ साली महेश मांजरेकर दिग्दर्शित 'नटसम्राट' हा सिनेमा सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आला. नाना पाटेकरांनी सुद्धा रुपेरी पडद्यावर आपल्या खास अभिनय शैलीमध्ये 'नटसम्राट' साकारला. 

आता 'नटसम्राट' चा अधिकृत तेलगू रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत  आहे. मराठीमधील अभिजात कलाकृती आता तेलगू भाषेत 'रंगा मार्थाण्डा' या नावाने येणार आहे. तेलगू मधील प्रथितयश दिग्दर्शक कृष्णा वामसी या रिमेकचं दिग्दर्शन करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय सिनेसृष्टीतील प्रतिभासंपन्न कलाकार प्रकाश राज यामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 

 

 

आता या रिमेकमध्ये प्रकाश राज यांच्यासह आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. परंतु ही गाजलेली कलाकृती तेलगू भाषिक प्रेक्षकांना नक्कीच मंत्रमुग्ध करेल यात शंका नाही. 

Recommended

PeepingMoon Exclusive