अमृता सुभाषच्या ओढणीचं स्मिता पाटील कनेक्शन

By  
on  

नुकताच 17 ऑक्टोबर रोजी स्मिता पाटील यांचा वाढदिवस साजरा झाला. स्मिता पाटील ह्या मराठी व हिंदी सिनेसृष्टी गाजवणा-या दिग्गज अभिनेत्री. पडद्यावरील सौंदर्यांच्या साचेबद्ध कल्पना त्यांनी मोडीत काढली. हिंदी आणि मराठी दोन्ही सिनेमांमध्ये त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आणि कधीच मागे परतून पाहिलं नाही. अवघ्या वयाच्या 31 व्या वर्षी स्मिता यांनी जगाचा निरोप घेतला.पण आपल्या सिनेकारकिर्दीने सिनेसृष्टीला मोठं योगदान दिलं. तर आजच्या  पिढीतील मराठीतील एक गुणी आणि प्रतिभसंपन्न अभिनेत्री म्हणून अमृता सुभाष हे नाव डोळ्यासमोर येतं. या दोघींचं एक खास कनेक्शन आहे आणि ते पण ओढणीचं. तुम्ही म्हणाल ओढणीचं म्हणजे नेमकं कोणतं. तुम्हालासुध्दा हे जाणून घेतल्यावर आनंदच होईल

अभिनेत्री अमृता सुभाष हिला स्मिता पाटील यांची ओढणी भेट म्हणून मिळाली आणि ती ख-या अर्थाने भाग्यवान ठरलीय.  याचा फोटो अमृताने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तर झालं असं नुकतंच मामी फिल्म फेस्टिव्हलला सुरूवात झाली. या कार्यक्रमाचं निमित्त आणि स्मिता पाटील यांचा वाढदिवस याचं औचित्य साधत अमृताने स्मिता पाटील यांची ओढणी परिधान केली होती.  त्या कार्यक्रमाची आठवण अमृताने शेअर केली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Today is Smita Patil Ji ‘s birthday. Today was MAMI festival opening ceremony. ThIs dupatta I am wearing is her dupatta. Her sister gifted it to me after watching my film Astu. Her name is Anitatai. She told me after I get old and stop working, I should gift this dupatta to someone who l think is taking ahead Smita tai’s tradition . This is a precious gift. Today on Smita tai’s birthday as I was missing her a lot, I wore this dupatta for MAMI opening. I put a bindi like her and wore jhumkas. And one beautiful thing happened. As I entered the auditorium and the show started a butterfly came there. It did. In those flashy lights it came from nowhere. Everyone was amused. It was flying and then it went outside. It came very near to me. Seeing a butterfly in an award ceremony in an enclosed auditorium was surreal. Then after some time Deepika Padukone and Vishal Ji Bharadwaj awarded Diptiji Nawal, then a video about Dipti di’s work was playing where suddenly Diptidi and Smitadi appeared on screen in a photo . .. my eyes were full of tears.#missing #birthday #favoriteactress आज स्मिताताई पाटीलचा वाढदिवस होता. त्याच दिवशी मामी मोहोत्सवाचं उद्घाटन हा अपूर्व योगायोग.. ही ओढणी तिची आहे. तिच्या ताईनं माझं अस्तु मधलं काम बघून मला दिली होती. आणि सांगितलं होतं, तू जेव्हा या क्षेत्रात काम करणं थांबवशील तेव्हा तुझ्यानंतर ही ओढणी अशा मुलीला दे जी तुझ्या मते स्मिताची परंपरा पुढे नेत असेल. ही भेट माझ्यासाठी अमूल्य आहे. आज तिच्या वाढदिवशी तिची आठवण काढत तिची ही ओढणी घेतली. तिच्यासारखं मोठं कुंकू लावून झुमके घालून या समारंभाला पोचले. कार्यक्रम सुरु झाला आणि एक विलक्षण गोष्ट घडली. त्या बंद आॅडीटोरिअम मधे झगमगत्या दिव्यात एक सुंदर फुलपाखरु आलं. प्रेक्षकात उडायला लागलं. अनेकांना त्या ठीकाणी ते फुलपाखरु पाहून आश्चर्य वाटलं. थोड्या वेळ उडून ते निघून गेलं. काहीच वेळात दिपीका पदुकोन आणि विशालजी भारद्वाजांनी दिप्ती नवलजींना पुरस्कार दिला. त्यावेळी दिप्तीदींच्या कामावर आधारित व्हीडीओ सुरु झाला आणि एका अवचित क्षणी स्मितादी आणि दिप्तीदिंचा फोटो पडद्यावर झळकला. माझे डोळे भरुन आले.

A post shared by Amruta Subhash (@amrutasubhash) on

अमृता सुभाष हीने आतापर्यंत दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. अमृता सुभाषचं 'अस्तु' या सिनेमातील काम स्मिता पाटील यांच्या बहिणीला प्रचंड आवडलं. सिनेमाच्या प्रिमिअरच्या वेळी स्मिता पाटील यांची मोठी बहिण अनिता यांनी स्मिता पाटील यांची एक ओढणी अमृताला भेट म्हणून दिली. त्यावेळी त्यांनी अमृताला सांगितलं की, 'तू स्मीची (स्मिता पाटील) गोष्ट पुढे घेऊन जाशील असं मला वाटतंय. असंच मनापासून काम करं. जेव्हा तुला हे क्षेत्र सोडावसं वाटेल तेव्हा तू ही ओढणी फक्त तुझ्याकडे ठेवू नकोस. तर ही स्मी ची ओढणी अशा  एका अभिनेत्रीला दे, जी स्मी ची गोष्ट पुढे घेऊन जाईल. 

Recommended

Loading...
Share