By  
on  

'लग्नाची वाईफ वेडींगची बायको' मधली ही विदेशी अभिनेत्री आहे तरी कोण ?

देशी लग्नाचा विदेशी गुताडा अशी हटके टॅगलाईन घेऊन 'लग्नाची वाईफ वेडींगची बायको'  एक नवी मालिका छोट्या पडद्यावर लवकरच रसिकांच्या भेटीला येतेय. ह्या नव्या मालिकेची सर्वत्रच चर्चा रंगलीय. या मालिकेत मारिया या विदेशी पत्नीची भूमिका साकारणा-या अभिनेत्री विषयी सर्वत्र उत्सुकता लागून राहिली आहे. ही अभिनेत्री कोण म्हणून सर्वच जणांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

विदेशी डॉल ही 'लग्नाची वाईफ वेडींगची बायको'  मालिकेत भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव लियाना आनंद असं नाव आहे. नुकतीच तिने झी अवॉर्ड सोहळ्यामध्ये आपल्या सहकलाकारांसह खास उपस्थिती दर्शवली. लियानाची ही पहिलीच मालिका असून ती तिच्या भूमिकेसाठी प्रचंड उत्सुक आहे. लियाना ज्याप्रमाणे मालिकेमध्ये स्टायलिश आणि ग्लॅमरस दाखविली आहे. त्याप्रमाणे ती प्रत्यक्षातही तितकीच बिनधास्त आणि स्टायलिश आहे.

 

 

दरम्यान, या मालिकेमध्ये विजय आंदळकर यांनी मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली आहे. विजयने यापूर्वीही अनेक मालिका आणि सिनेमांत काम केले आहे.  देशी लग्नाचा विदेशी गुताडा अशी हटके टॅगलाईन असँणारी 'लग्नाची वाईफ वेडींगची बायको' ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive