By  
on  

अमृता खानविलकरच्या घरातील हा सुपर क्युट डान्सर पाहिलात का?

सध्या सगळीकडे धूम आहे ती ‘बाला चॅलेंज’ ची. अक्षय कुमारच्या हाऊसफुल 4 या सिनेमातील ‘बाला साँग’ मधील नृत्याच्या स्टेप्स या चॅलेंजमध्ये करायच्या असतात. अभिनेता अक्षय कुमारवर हे गाणं चित्रित झालं आहे. हे चॅलेंज स्विकारून अनेक सेलिब्रिटींनी त्यांचे डान्स करतानाचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकरनेही तिच्या घरातील सुपर क्युट डान्सरचा व्हिडिओ शेअर केला आहे.

 

 

तिच्या घरातील एक चिमुकला सदस्य या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे. हा व्हिडिओ तिने शेअर केला आहे. या पोस्टला कॅप्शन देताना ती म्हणते, ‘आमच्या घरातील क्युटेस्ट बाला चॅलेंज’ या पोस्टमध्ये तिने अक्षय कुमार आणि रितेश देशमुखला टॅग केलं आहे. अमृता आता सचिन कुंडलकर यांच्या ‘पाँडिचेरी’ सिनेमातून रसिकांच्या समोर येणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive