By  
on  

‘श्री राम समर्थ’ सिनेमात पारंपरिक आणि आधुनिकतेचा मेळ: शंतनु मोघे

हिंदू धर्माच्या एकजुटीसाठी बलोपासनेचा उपदेश देणारे संत म्हणजे समर्थ रामदास. समर्थ रामदासांनी कोणत्याही कर्मकांडाला न जुमानता केवळ शक्ती आणि युक्तीच्या जोरावर हिंदू धर्माच्या उत्थानासाठी प्रयत्न केले. समर्थ रामदासांचा प्रेरणदायी उपदेश पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न श्री राम समर्थ सिनेमाच्या माध्यामातून केला आहे. या सिनेमात शंतनू मोघे समर्थ रामदासांच्या भूमिकेत आहेत.

यावेळी पीपिंगमून मराठीशी पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेचा मला समर्थ रामदासांची व्यक्तिरेखा साकारताना खुप मदत झाली. खुप बारकाईने अभ्यास केल्यास असं दिसून आलं की दासबोधातील सत्व या भागाचा आणि शिवाजी महाराजांच्या राज्यपद्धतीमध्ये खुप साम्य आहे. हे दोघेही समकालीन असल्याने त्यांच्या विचारसरणीतील साम्य लक्षात घेण्याजोगे आहे.’

Recommended

PeepingMoon Exclusive