By  
on  

ईशा केसकरने बॉयफ्रेंड ऋषी सक्सेनासोबत शेअर केला हा खास फोटो

सध्या ‘शनाया’ साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे ईशा केसकर. ईशा सोशल मिडियावर भलतीच अ‍ॅक्टीव्ह असते. ईशाने इन्स्टावर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती आणि बॉयफ्रेंड ऋषी सक्सेना दिसत आहे. ऋषीसोबत cozy mood मधील फोटो शेअर करताना ईशाने कॅप्शनही हटके दिलं आहे. ‘प्रेमामुळे मैत्री दृढ होते, पण प्रेम उत्तम असेल तर मैत्रीचा सुगंध दरवळत राहतो’

 

ईशा केसकर आणि ऋषी सक्सेना कायमच एकमेकांचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असतात. या दोघांनी सोशल मिडियावर त्यांचं नातं कधीच लपवलेलं नाही. सध्या ईशा 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनायाची भूमिका साकारत आहे. ती ‘गर्लफ्रेंड’ सिनेमात दिसली होती. ऋषी सक्सेना लंडनमध्ये शुटिंग करत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive