By  
on  

मुंबईतील या भागात भाऊ कदम यांनी काढले आहेत बालपणीचे दिवस

भाऊ कदम हे मराठी सिनेसृष्टीतले कॉमेडी किंग. विनोदाचं अचूक टायमिंग आणि प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचुनही असलेला साधेपणा यामुळे भाऊ कदम यांची लोकप्रियता अफाट आहे. आज प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या या अभिनेत्याने संघर्षाच्या काळात चाळीतल्या एका लहान घरात दिवस काढले होते. संघर्षाच्या दिवसाची जाण ठेवत भाऊ कदम यांनी स्वतःच्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. 

भाऊ कदम यांनी पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये त्यांनी 'माझं बालपण' असं कॅप्शन लिहिलं आहे. भाऊ कदम यांच्या या फोटोमागे वडाळा येथील बीपीटी क्वार्टर येथील इमारत आहे. भाऊ कदम यांचे कुटुंब कोकणी असून त्यांचे वडील बीपीटीमध्ये नोकरी करायचे. बालपणापासूनच घरातील सर्व मंडळी भाऊ कदम यांना 'भाऊ' अशी हाक मारत. वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयामधून भाऊ कदम यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Majha balpan !

A post shared by Bhau Kadam (@bhaukadamofficial) on

लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेले भाऊ सुरुवातीला मराठी नाटकांमध्ये, सिनेमा आणि मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका करायचे. पण त्यानंतर 'फु बाई फु' या रिऍलिटी शो मुळे भाऊ कदम प्रसिद्धीच्या झोतात आले. आणि त्यानंतर 'चला हवा येऊ द्या' मुळे भाऊ कदम हे नाव जगभरात पोहोचलं.

Recommended

PeepingMoon Exclusive