By  
on  

राणादाने या व्यक्तीला वाहिली आदरांजली, शेअर केला फोटो

कुस्ती ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे. रुस्तुम-ए-हिंद , डबल महाराष्ट्र केसरी दादू चौगुले यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या निधनानंतर क्रिडा क्षेत्रातील अनेकांनी दु:ख व्यक्त केलं. यासोबतच अभिनेता हार्दिक जोशी म्हणजेच राणादा यानेही दादू चौगुले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राणाने यावेळी दादूंच्या आठवणींना उजाळा दिला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आपल्या सगळ्यांचेच लाडके रुस्तमे हिंद, महान भारत केसरी, डबल महाराष्ट्र केसरी दादुमामा चौघुले ज्यांच्याकडून मी खूप काही शिकलो,आत्ताच कळलं की ते आपल्याला सगळ्यांना सोडून गेले. खरं तर अजूनही विश्वास बसत नाहीये की ते आता आपल्यात नाहीयेत. त्यांच्यासोबतचा तो वज्रकेसरीचा सामना अजूनही तसाच स्पष्ट आहे डोळ्यांसमोर. सगळं आठवतंय मला, त्यांच्यासोबत काम करत असतानाचे सगळे अनुभव, त्यांनी शिकवलेल्या सगळ्या गोष्टी, सगळ्या आठवणी सगळंच अगदी स्पष्ट आहे अजूनही नजरेसमोर. महाराष्ट्राच्या या लाडक्या पैलवानाने, ज्याने भल्या भल्यांना आस्मान दाखवलं, त्यांच्या सोबतचा प्रत्येक क्षण बरच काही शिकवून जाणारा होता. तुझ्यात जीव रंगलाच्या, झी मराठीच्या आणि सोबो फिल्म च्या संपूर्ण टीम कडून त्यांना भावपूर्ण आदरांजली तुम्ही नेहमीच स्मरणात आणि आमच्या आठवणीत रहाल मामा

A post shared by Hardeek Joshi (@hardeek_joshi) on

 

यावेळी सोशल मिडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये हार्दिक म्हणतो, ‘आपल्या सगळ्यांचेच लाडके रुस्तमे हिंद, महान भारत केसरी, डबल महाराष्ट्र केसरी दादुमामा चौघुले ज्यांच्याकडून मी खूप काही शिकलो,आत्ताच कळलं की ते आपल्याला सगळ्यांना सोडून गेले. खरं तर अजूनही विश्वास बसत नाहीये की ते आता आपल्यात नाहीयेत. त्यांच्यासोबतचा तो वज्रकेसरीचा सामना अजूनही तसाच स्पष्ट आहे डोळ्यांसमोर. सगळं आठवतंय मला, त्यांच्यासोबत काम करत असतानाचे सगळे अनुभव, त्यांनी शिकवलेल्या सगळ्या गोष्टी, सगळ्या आठवणी सगळंच अगदी स्पष्ट आहे अजूनही नजरेसमोर. महाराष्ट्राच्या या लाडक्या पैलवानाने, ज्याने भल्या भल्यांना आस्मान दाखवलं, त्यांच्या सोबतचा प्रत्येक क्षण बरच काही शिकवून जाणारा होता. तुझ्यात जीव रंगलाच्या, झी मराठीच्या आणि सोबो फिल्म च्या संपूर्ण टीम कडून त्यांना भावपूर्ण आदरांजली तुम्ही नेहमीच स्मरणात आणि आमच्या आठवणीत रहाल मामा..... विशेष म्हणजे राणाला देखील दादू यांनी कुस्तीचे धडे दिले होते.

Recommended

PeepingMoon Exclusive