By  
on  

सोनू निगमच्या स्वरांनी चिंब झालेलं ‘ट्रीपल सीट’मधील हे गाणं ऐकलं का?

सध्या ‘ट्रीपल सीट’ सिनेमाची जोरदार चर्चा आहे. अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे आणि पल्लवी पाटील यांच्या अभिनयाने सजलेला हा सिनेमा २४ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.  या सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या समोर येत आहेत. त्यापैकी ‘काय तू’ हे गाणं रसिकांच्या समोर आलं आहे. सोनू निगम यांच्या आवाजात सजलेलं हे गाणं प्रेक्षकांना आवडत आहे. या गाण्यात अंकुश आणि शिवानीची केमिस्ट्री रसिकांना अनुभवता येणार आहे.

 

अश्विनी शेंडे यांनी या गीताचे बोल लिहिले आहेत. अविनाश-विश्वजीत यांचं संगीत संयोजन आहे. नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया यांची निर्मिती असलेल्या ‘ट्रिपल सीट’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि क्रिएटीव्ह दिग्दर्शन अॅड. अभिजित अरविंद दळवी यांचे आहे. उत्तम स्वर, संगीत असलेलं हे गाणं सिनेमाला चार चांद लावतं यात शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive