सैराट हा सिनेमा येऊन बरेच दिवस उलटून गेले तरी लोक अजूनही रिंकूच्या अदाकारीला विसरले नाहीत. त्यामुळेच रिंकूचं फॅन फॉलोविंग आजही बरंच आहे. सैराटनंतर काहीसा ब्रेक घेऊन रिंकूने ‘कागर’मधून पदार्पण केलं. यातील तिच्या अभिनयाचं कौतुकही झालं. रिंकू सोशल मिडियावरही बरीच अॅक्टीव्ह असते. सोशल मिडियावर ती नेहमी फोटो पोस्ट करत असली तरी चाहत्यांना तिच्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता जास्त असते.
अलीकडेच एका चाहत्याने रिंकूला इन्स्टाग्राम वरील ‘आस्क मी एनीथिंग’मध्ये रिलेशनशीप स्टेट्स बद्दल प्रश्न विचारला होता. रिंकूला ‘तू सिंगल आहे का?’ असा प्रश्न विचारला. त्यावर रिंकूने ‘हो’ असे उत्तर दिले आहे. तर दुसऱ्या एका चाहत्याने तिला ‘तुझा बॉयफ्रेंड आहे का?’ असा प्रश्न विचारला. त्यावर रिंकूने ‘नाही’ असे उत्तर दिले आहे. रिंकूच्या या उत्तरांमुळे तिच्या चाहत्यांच्या आनंदात भर पडली असेल यात शंका नाही.