By  
on  

अभिनेत्री गायत्री दातार दापोलीमध्ये शूटिंगसाठी... पण शूटिंग नेमकं कशाचं?

लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली 'तुला पाहते रे' या मालिकेने नुकतंच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेतील सर्व व्यक्तिरेखांवर प्रेक्षकांनी प्रेम केले. या मालिकेतील सगळ्यात लोकप्रिय पात्र म्हणजे इशा. साधीसुधी तरीही हुशार असलेल्या इशावर प्रेक्षकांनी खूप प्रेम केले. इशाची भूमिका साकारणाऱ्या गायत्री दातार पहिल्याच मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आली. 

'तुला पाहते रे' संपल्यानंतर अभिनेत्री गायत्री दातार'निम्मा शिम्मा राक्षस' या बालनाट्यातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या नाटकाला आणि त्यातील गायत्रीच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु आता गायत्रीच्या एका नव्या इंस्टाग्राम पोस्टमधून गायत्रीने तिच्या नव्या प्रोजेक्ट्ची माहिती सर्वांना दिली आहे. 

 

या फोटोमध्ये गायत्री कोकणामधील दापोली येथे शूटिंग करत असून आता गायत्री नक्की कशासाठी शूट करत आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. आता गायत्री लवकरच नव्या माध्यमातून भेटीला आली, तर नवल वाटायला नको . 

 

Recommended

PeepingMoon Exclusive