By  
on  

पाच सिनेमे एकत्र प्रदर्शित होऊन पण 'हिरकणी'ची बॉक्स ऑफिसवर दिवाळी!

धनत्रयोदशीपासून दिवाळीची सुरुवात झाली आहे आणि 'हिरकणी' प्रदर्शित झाल्यामुळे दिवाळी मराठमोळ्या पध्दतीने साजरी करण्याची जय्यत तयारी सुध्दा सर्वत्र चालू झाली आहे.

दिवाळी म्हटलं की जल्लोष आणि उत्साह आणि असाच उत्साह आता चित्रपटगृहांतही दिसू लागलाय. आज शुक्रवार म्हणजे प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा वार... दरवर्षी चित्रपटसृष्टी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी चित्रपट प्रदर्शित करतात. यंदाच्या दिवाळीत देखील दोन मराठी आणि तीन हिंदी असे एकूण ५ चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.

'हिरकणी', 'ट्रिपल सीट', 'सांड की आँख', 'मेड इन चायना' आणि 'हाऊसफुल ४' असे पाच चित्रपट जरी आज प्रदर्शित झाले असले तरी देखील प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्यात यशस्वी झाली आहे आणि हे सर्व काही शक्य झाले ते केवळ माय बाप रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि त्यांच्या पाठींब्यामुळेच.

प्रसाद ओक दिग्दर्शित आणि चिन्मय मांडलेकर लिखित एका आईच्या धाडसाची, धैर्याची आणि पराक्रमाची गाथा असलेला 'हिरकणी' चित्रपट २४ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला आणि एका दिवसातच प्रेक्षकांकडून पसंतीची पावती मिळवत आहे. सोनाली कुलकर्णी, अमित खेडेकर यांची यामध्ये प्रमुख भूमिका असून मॅगीज पिक्चर्स यांच्या सहकार्याने इरादा एंटरटेनमेंटने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. राजेश मापुस्कर हे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. लॉरेन्स डिसुझा हे सहनिर्माते आणि 'इरादा एंटरटेनमेंट'च्या फाल्गुनी पटेल या निर्मात्या आहेत. 

 

 

प्रेक्षकांचे प्रेम 'हिरकणी'सोबत असेच सदैव राहून दे... हीच प्रार्थना!  जय भवानी! जय शिवराय!

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive