By  
on  

....म्हणून या मराठी सेलिब्रिटींसाठी यंदाची दिवाळी आहे खास

सेलिब्रिटींची दिवाळी नेहमीच खास असते. आपल्या आवडत्या मालिकांमधल्या कलाकारांनी त्यांचे दिवाळीचे खास अनुभव शेयर आहेत. 

 

 

हर्षदा खानविलकर (यंदाच्या दिवाळीत डबल सेलिब्रेशन)

यंदाची दिवाळी माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे. कारण यंदा दिवाळीत माझी स्टार प्रवाहवर ‘रंग माझा वेगळा’ ही नवी मालिका सुरु होतेय. त्यामुळे डबल सेलिब्रेशन आहे. खरं सांगायचं तर दिवाळीच्या खूप कडू गोड आठवणी आहेत. दिवाळीतच माझं वडिलांचं छत्र हरपलं. त्यांना जाऊन १८ वर्ष होतील. पण वडिलांची कमतरता माझा भाचा कुशलने भरुन काढली. गेली १७ वर्ष तो माझ्या आयुष्यात नवनवे रंग भरतो आहे. दिवाळीच्या फराळात माझी फारशी मदत नसली तरी माझी आई उत्तम फराळ बनवते. आणि मी उत्तम खवय्यी असल्यामुळे त्यावर मनसोक्त ताव मारते. दिवाळीत कुटुंबासमवेत घालवलेला वेळ वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा देऊन जातो असं मला वाटतं

विशाल निकम – (गरजुंना खाऊ आणि कपडे वाटप करुन साजरी करणार दिवाळी)

‘साता जल्माच्या गाठी’ मालिकेतील युवराज म्हणजेच विशाल निकम मुळचा सांगलीचा. घरचा मुख्य व्यवसाय शेती असल्यामुळे घरात दिवाळी सणाचं खूप महत्त्व आहे. माझ्या घरी दिवाळीच्या पहिल्या दिवशी शेणापासून बळीराजाची मूर्ती तयार करुन त्याची पुजा केली जाते. सहकुटुंब ही पूजा करुन मग फराळावर यथेच्छ ताव मारला जातो. लहानपणी आम्ही सर्व मुलं एकत्र येऊन किल्ला बनवत असू. महिनाभर आधापासून आम्ही मुलं तयारी करायचो. मातीपासून बनवलेला किल्ला, शिवाजी महाराज आणि मावळे यांचा थाट काही औरच असायचा. माझ्यामते दिवाळी सणाचा आनंद इतरांसोबत वाटण्यात खरी मजा आहे. यंदा गरजुंना खाऊ आणि कपडे वाटप करुन दिवाळी सण साजरा करणार आहे.

एकता लब्दे - (फराळ ते घरची साफसफाई यात माझा आवर्जून सहभाग)

‘विठुमाऊली’ मालिकेतील रखुमाई म्हणजेच एकता लब्देचा आवडता सण म्हणजे दिवाळी. दिवाळीच्या पहिल्या दिवशी सहकुटुंब सिद्धीविनायकाचं दर्शन घेणं हे मी नित्यनेमाने करते. दिवाळीची चाहूल लागली की घरातल्या साफसफाईपासून ते अगदी फराळापर्यंत प्रत्येक गोष्टीत माझा सहभाग असायचा. शूटिंगमुळे आता ते शक्य होत नाही. पण यंदाच्या दिवाळीत वर्षभरात न भेटलेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना मी आवर्जून भेटणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive