By  
on  

पाहा Photos: पारंपरिक अंदाजात असलेल्या रिंकू राजगुरुला पाहून तुम्ही तिच्या प्रेमात पडाल

रिंकु राजगुरु हे नाव आता नवं नाही. 'सैराट' या आपल्या पहिल्याच सिनेमातुन 'आर्ची'ची बिनधास्त भुमिका साकरुन रिंकुने समीक्षकांची पसंती मिळवलीच शिवाय प्रेक्षकांचं सुद्धा प्रेम मिळवलं. 

'सैराट' नंतर रिंकु राजगुरुच्या करियरची घोडदौड जोरात सुरु झाली आहे. 

'सैराट'नंतर रिंकुने 'कागर' या मराठी सिनेमात काम केले. या सिनेमाने बाॅक्स ऑफीसवर इतकी कमाल दाखवली नसली तरी या सिनेमामधील रिंकुच्या कामाचं सगळीकडुन कौतुक झालं. 

रिंकुने नुकतंच दिवाळीनिमित्त पारंपरिक अंदाजात स्वतःच्या कुटूंबासोबत हटके फोटोशुट केलं. 

या फोटोंमध्ये रिंकु कमालीची सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मिडीयावर सुद्धा चांगलेच व्हायरल झाले आहेत. 

रिंकु राजगुरु लवकरच 'मेकअप' या आगामी मराठी सिनेमामधुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिंकुच्या चाहत्यांना आणि सर्व मराठी प्रेक्षकांना या सिनेमाची उत्सुकता आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive