By  
on  

नागपुरात रंगणार मराठी रंगभूमी दिन सोहळा

आज 5 नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन. या दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे नागपुरात विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे. मराठी रंगभूमीच्या क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल शहरातील नाट्यकलावंत शंतनू ठेंगडी, अकोला येथील काजल राऊत, अमरावती येथील प्रवीण प्रभाकर या विदर्भातील हरहुन्नरी कलावंतांचा गौरवही केला जाणार आहे तसेच मराठी रंगभूमीच्या एकंदर वाटचालीवर सत्कारमूर्तीचे सादरीकरण आणि मराठी रंगभूमीच्या इतिहासावरही प्रकाश टाकला जाणार आहे. 

ज्येष्ठ नाट्य समीक्षक व अभ्यासक प्रकाश एदलाबादकर यांची ह्या विशेष कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असेल. नंदनवन महिला महाविद्यालयात सायंकाळी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह नरेश गडेकर यांनी सांगितले आहे.

 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive