By  
on  

मराठी रंगभूमी दिन : प्रशांत दामले आणि प्रसाद ओक घेऊन येणार नवी नाट्यकृती?

आज 5 नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन. रंगभूमीदिनानिमित्त अभिनेता प्रसाद ओकने आपल्या रंगभूमीवरील मित्र आणि रंगकर्मी प्रशांत दामलेंना खास शुभेच्छा दिल्या पण मात्र ह्या शुभेच्छा काहीतरी वेगळं सांगू इच्छितात. रंगभूमीसाठी अविरत झटणा-या प्रशांत दामले या मित्राला प्रसाद ओकने  "प्रशांत... आता तू नव्या पिढीसाठी काहीतरी करायला हवं... तो म्हणाला... तू म्हणशील तसं..."#तूम्हणशीलतसं सविस्तर माहिती लवकरच...!!! " अशा शुभेच्छा देत प्रशांत दामले यांच्यासोबतचा फोटो शेयर केला आहे. 

प्रसादच्या या पोस्टवरुन हे लख्ख दिसतंय की प्रसाद आणि प्रशांत दामले एकत्र येऊन लवकरच एक नवी नाट्यकृती घेऊन रसिकांसमोर येत आहेत. त्यामुळे ह्या पोस्टद्वारे नाट्यप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. पण कोणतं नाटक आहे, विषय काय निर्मिती कोणाची अभिनय कोण करतंय ह्या सर्व बाबी अद्याप गुलदस्त्यातच आहेत आणि त्याची सविस्तर माहिती लवकरच आपल्यापर्यंत पोहचेल यात शंका नाही. 

 

 

 

अभिनेता प्रसाद ओक दिग्दर्शित आणि सोनाली कुलकर्णी अभिनीत नुकत्याच प्रदर्शित 'हिरकणी' ह्या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली. अजुनही सिनेमा महाराष्ट्रात सर्वत्र उत्स्फुर्त सुरु असून बॉलिवूड सिनेमांवरही तो भारी पडला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive