पुन्हा येणार प्रेमाची बहार, 'आणि काय हवं...?' वेबसिरीजच्या दुस-या सीजनच्या शुटींगला सुरुवात

By  
on  

एक एक्स प्लेयरची पहिली मराठी वेबसिरीज 'आणि काय हवं...?' ला प्रेक्षकांकडुन चांगला प्रतिसाद मिळाला. नवविवाहीत नवरा-बायकोची आंबटगोड प्रेमकहाणी असलेली ही वेबसिरीज प्रेक्षकांना आवडुन गेली. उमेश कामत-प्रिया बापट च्या लव्हेबल केमिस्ट्रीने या वेबसिरीजला चार चाँद लागले. 

या वेबसिरीजच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे, या बेबसिरीजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. उमेश कामतने स्वतःच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकुन या वेबसिरीजच्या शुटींगला लवकरच झाली आहे. 

 

वरुण नार्वेकर दुस-या सीझनचं सुद्धा दिग्दर्शन करणार आहेत. उमेश कामत-प्रिया बापट यांची गोड केमिस्ट्री पाहण्यासाठी त्यांचे चाहते पुन्हा एकदा उत्सुक आहेत.

Recommended

Loading...
Share