By  
on  

दात दुखीवर मात करत सुबोधने केलं 'शुभलग्न सावधान'चं शूट पूर्ण

दातदुखीचा त्रास प्रत्येकांना कधी ना कधी होतोच, पण त्याच्या वेदना असह्य झाल्या तर कोणत्याच कामात लक्ष लागत नाही. अगदी त्याचा मुळापर्यंत उपचार केल्याशिवाय या वेदना थांबत नाही. असच काहीसं दुबईत 'शुभलग्न सावधान' सिनेमाच्या शुटींगदरम्यान सुबोध भावेसोबत झालं होतं.

सुबोधने दुबईतील एका दंतचिकित्सकाकडे त्यावर तात्पुरते उपचारदेखील घेतले होते. पण काही केल्याशिवाय त्याचं दुखणं काही थांबत नव्हतं. त्यामुळे, सिनेमाचे शुटींग वेळापत्रकच विस्कळीत होणार होते. मात्र सुबोधने, आपल्या दातामुळे सर्वांची गैरसोय करण्यापेक्षा शूट लवकर आटपण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी दातदुखीचे कोणतेही चिन्ह चेहऱ्यावर न आणता, त्याने आपला अभिनय चोख बजावण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला.

सिनेमाचे दिग्दर्शक समीर सुर्वे आणि कार्यकारी निर्माते अभय शेवडे यांनीदेखील त्याला साथ देत, सिनेमाचे चित्रीकरण नियोजित वेळेपेक्षा एक दिवस आधी पूर्ण करत, सुबोधला मोकळे केले. त्यांनतर सुबोधने थेट मुक्काम पोस्ट पुणे गाठत आपल्या दुखऱ्या दातावर उपचार घेतले. सुबोधच्या या 'दात'दुखीवर त्याने अश्याप्रकारे केलेली ही मात खरंच दाद देण्यासारखीच आहे.

पल्लवी विनय जोशी निर्मित सुबोध भावे आणि श्रृती मराठे यांची प्रमुख भूमिका 'शुभलग्न सावधान' हा सिनेमा येत्या 12 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive